Monday, 27 February 2017

२७ फेब्रुवारी - जागतिक मराठी भाषा दिवस

दिनविशेष: २७ फेब्रुवारी- जागतिक मराठी भाषा दिवस

मराठी साहित्याचा मानदंड लेखक, नाटककार, कविवर्य वि.वा.शिरवाडकरांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

या आपल्या अमृततुल्य मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याचे काम हे मनाने मराठी असलेल्या प्रत्येक माणसाने करणे जरुरी आहे.

आजघडीला ‘मोबाइल’ वरून आपण किमान १०-१५ तरी लघुसंदेश (SMS किंवा Chat) दररोज पाठवतो.  बहुतेकवेळा हे संदेश इंग्रजीतून किंवा मराठी शब्द इंग्रजी अक्षरात लिहून पाठवत असतो. उदाहरणार्थ "ठीक आहे" हे  "thik aahe" असे टाईप करून पाठवले जातात. हिच संदेश पाठवण्याची पद्धत जर आपण बंद केली तर!!!

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक मोबाईल मध्ये देवनागरी अक्षरांचे (फॉन्टस) पर्याय उपलब्ध आहेत. सुरुवातीला जरी हे टाईप करण्यास कठीण वाटत असले तरी एकदा सवय झाल्यावर तुम्हाला सुद्धा मराठी भाषेत टाईप करायची गोडी लागेल.

- एक मराठी माणूस

Post #29

Friday, 24 February 2017

प्रेम व्यक्त नक्की करा

"प्रेम व्यक्त नक्की करा"

 प्रेम हे एक असे नाते आहे जे सोबत असले की जग सुंदर वाटते आणि सोबत नसले की आयुष्य सुद्धा एक बोझे वाटते. आयुष्यात एकदा कोणावर तरी प्रेम होतेचं पण ते त्या व्यक्ती समोर व्यक्त करायला मनं घाबरते. आपण त्या व्यक्तीसाठी जीव देण्यासाठी ही तयार असतो. पण हे फक्त आपल्या मनाला माहित असतं.

 त्या प्रेमाचा काय उपयोग जे आपण कोणासमोर व्यक्त नाही करू शकत. प्रेम व्यक्त करणे हा गुन्हा नाही आहे. प्रेम म्हणजे आपल्या मनात एखाद्या व्यक्ती साठी निर्माण झालेली भावना आहे. ही भावना फक्त आपल्याला त्या व्यक्ती समोर व्यक्त करायची असते.

 प्रेम हे आयुष्यभर साथ देण्याचे वचन आहे. आयुष्यात प्रेम असले की आयुष्य फुलासारख फुलतं. मन हे पाखरू सारखं प्रेमावर खेळतं. प्रेम व्यक्त करायला शिका. प्रेम व्यक्त केल्यामुळे आपले ज्याच्यावर प्रेम आहे ते आपल्यासोबत राहते. पण प्रेम व्यक्त नाही केले की तेच प्रेम आपल्यापासून दूर जाताना दिसते.

 थोडे प्रयत्न तर करून बघा तुमचे प्रेम जर खरे असेल तर ते नक्की साथ देल. प्रेमव्यक्त करण्याची सोपी पद्धत प्रेमपत्रे द्वारे केली जाते. ज्या व्यक्तीवर आपले प्रेम आहे त्या व्यक्ती समोर आपल्याला काही बोलता येत नाही. यामुळेच आपण त्यांना प्रेमपत्र लिहतो. प्रेमपत्रात आपल्या मनातील सगळ्या भावना आपण लिहून काढतो आणि ते प्रेमपत्र आपण त्या व्यक्तीला देतो. ती व्यक्ती सुद्धा जर आपल्यावर प्रेम करत असेल तर हे प्रेमपत्र सुद्धा संभाळून ठेवते.

 खरे तर प्रेमाची सुरवात प्रेमपत्रातूनचं होते. पण आता स्मार्टफोनचे युग आल्यामुळे प्रेमपत्र हरवून गेले आहे. याचे कारण या काळात कोणालाही प्रेमपत्र लिहण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळेच "मराठी प्रेमपत्र 💝💌" ही अँप बनवण्यात आली आहे. या अॅपचा फायदा असा आहे की यात प्रेमपत्रे बनवून ठेवली आहेत. फक्त ती तुम्हाला वाचायची आहेत आणि जे प्रेमपत्र आवडेल ते तुमच्या प्रियकराला पाठवायचे आहे. यात गंमत अशी आहे की तुम्ही या अॅप मधील मायना या फिचर मध्ये जाऊन तुमच्या प्रियकराचे आणि तुमचे नाव लिहू शकता. यामुळे तुमचा वेळ ही वाचेल आणि तुमचे प्रेम सुद्धा व्यक्त होईल.

- मिस्टि जानू

Post #27

Thursday, 23 February 2017

प्लीज, परत ये ना एकदा

हृदयाला स्पर्श करणारी प्रेमकथा...

तो बसची वाट बघत उभा असतो. बस आल्यावर बसमध्ये चढतो आणि टिकीट काढतो. बस चालू झाली आणि तो आठवणीच्या प्रवाहात मागे वाहू लागला. त्यावेळी तो ऑफिसला जायचा. रोजचा त्याचा प्रवास बसने होयाचा. तेव्हा ती हि त्याचवेळेची बस पकडायची. अशीच रोजची त्यांची झालेली ओळख मैत्रीच्या रुपात हळूहळू खुलत होती. अशाच एके वेळेस ती थोडी उदास वाटली. त्याने तिला विचारलं... "काय गं काय झालं आज अशी उदास का वाटतेस तू?" ती म्हणाली, काही नाही रे उद्या सकाळी आम्ही ५, ६ दिवसांसाठी गावी लग्नाला जाणार आहोत.. त्याने तिला विचारलेले कि तू उदास का वाटतेस पण हे ऐकून तो स्वत: पण उदास झाला होता.
पण त्याला आनंदही झाला होता कि ती आपल्यासाठी उदास झाली आहे. तो तिला म्हणाला, "अगं मग उदास होण्याचे काय कारण आहे त्यात?" ती म्हणाली, अरे मी ५, ६ दिवसांसाठी जाणार आहे आणि आता आपण ५, ६ दिवस.... असं म्हणून तिने तिचे शब्द आवरले. जाऊ दे... तुला काहीच वाटत नाही आहे ना ? तो म्हणाला, मला... मला कशाला काय वाटेल ? किती आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही गावाला जावा आणि लग्न Enjoy करा... त्याला तिच्या मनात काय चालू आहे हे जाणून घ्याचे होते.

      चेहऱ्यावर खोटे हास्य दाखवून ती त्याला म्हणाली, चल बाय माझा स्टॅाप आला. ती तिच्या डोळ्यातील पाणी लपवण्यासाठी त्याच्या नजरेला नजर देत नव्हती. तो हि खूप उदास झाला होता. पण जाता जाता तिचा हसरा चेहरा पाहावा म्हणून तो आनंदाच अवसान आणत म्हणाला, "Happy Journey" ती हसली पण अश्रू लपवत होती आणि ती बसमधून उतरली. दुसऱ्यादिवशी त्याचे ऑफिसला जायचे मन नव्हते. घरी राहून तिचीच आठवण येईल. ऑफिसला गेल्यावर कामात वेळ तरी निघून जाईल म्हणून तो ऑफिसला जायला निघतो. तसा तो फारच उदास असतो. तो बसस्टॅापवर जातो आणि पाहतो तर काय... ती बसस्टॅापवर उभी असते. त्याला आनंदही होतो पण स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तो तिला विचारतो, "अगं तू लग्नाला जाणार होतीस ना ?" ती म्हणते, "नाही गेली रे"... का? गं.. असचं नाही जावसं वाटलं म्हणून नाही गेली.. त्या क्षणी त्याला असं वाटतं कि ती आपल्यासाठीच नसेल गेली. त्याला खूप आनंद झाला होता. बस आली दोघे बसमध्ये चढले तो तिला पाहतच बसला होता. ती मात्र शांत बसली होती. असेच दिवस उलटत गेले. तिचं नंतर बसस्टॅापवर येणे कमी झाले होते आणि आली तरी शांत असायची. काही बोलायची हि नाही. त्याने अनेकदा तिला शांत राहण्यामागच कारण विचारलं पण काही नाही असं बोलून तिने ते टाळले. त्याला नंतर असे वाटू लागले कि "तिला माझ्याकडून तिच्यावरच्या प्रेमाची कबुली पाहिजे असेल".. मला जे तिच्याबद्दल वाटते तेच तिलाही माझ्याबद्दल वाटत असेल कदाचित....

     तिचा वाढदिवस येत होता त्याने ठरवलं तिच्या वाढदिवसाच्यादिवशी मी तिला सांगून टाकीन माझ्या मनातलं... तो तिला सांगतो तुझा वाढदिवस येतोय तेव्हा आपण कुठेतरी जाऊया का ? ती बोलते... ठीक आहे जाऊया... तिचा वाढदिवसाचा दिवस येतो. दोघे बसस्टॅापवर न भेटता दुसरीकडे भेटतात. तो तिच्यासाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छा घेऊन जातो. ती समोर येते. तो तिला म्हणतो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... आज खूप सुंदर दिसतेस तू... ती लाजते आणि Thank You बोलते.. तो तिला म्हणतो, आदिती मला तुला काही तरी सांगायचं आहे. ती म्हणते, सांग ना.. तो म्हणतो, "आदिती माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे" आणि फुलांचा गुच्छा तिला देतो. ती त्या फुलांचा गुच्छा घेते आणि म्हणते "आदित्य माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे".. आदित्य तिला म्हणतो, तू माझ्याशी लग्न करशील का ? आदिती त्याला म्हणते नाही.. का ? गं प्रेम करतेस मग लग्न का नाही करणार ? ती खाली मान घालते आणि त्याला म्हणते नाही करू शकणार आणि तिकडून निघून जाते. तो तिचा हात पकडतो पण ती हात झटकून तिकडून निघून जाते. तो विचारात पडतो. का आदिती अशी वागली ? लग्नासाठी होकार का नाही दिला. जर असंच करायचे होते मग प्रेमही का केले माझ्यावर.. त्याच्या मनात अनेक प्रश्न येत होते. त्याची उत्तरे त्याला तिच्याकडून पाहिजे होtती. तो तिच्या मागे मागे जातो पण ती त्याला दिसत नाही. तो खूप उदास होतो. त्याचे डोळे पाण्याने भरून येतात. नंतर तो घरी जातो.  

    दुसऱ्यादिवशी तो बसस्टॅापवर जातो पण ती येत नाही. असेच ४,५ दिवस निघून जातात. ती येतच नाही. तो ती का येत नाही हे बघण्यासाठी तिच्या घरी जातो. तिने तिच्या घरचा पत्ता त्याला आधीच सांगितलेला असतो. तो तिकडे जातो आणि तिकडे जाऊन त्याला शॅाकच लागतो. तिकडे गेल्यावर तिच्या फोटोला हार लागलेला असतो. तो तिच्या घरच्यांना विचारतो हे काय हिच्या फोटोला हार का लावला आहे ? तेव्हा तिचे घरचे बोलतात आम्ही २ महिन्यापूर्वी लग्नाला जात असताना आमच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यात आम्ही जखमी झालो पण आदितीचा तिकडेच मृत्यू झाला. हे ऐकून तो बोलतो कि हे असे कसे होईल आदिती तर ४,५ दिवस झाले फक्त आली नाही आहे म्हणून मी तिला पाहण्यासाठी इकडे आलो आहे. घरातल्यांना असं वाटत कि हा वेडा आहे कोण तरी ? ते त्याला बोलतात कि हेच सत्य आहे. तो जोरात आदिती असं ओरडतो आणि खालीच बसतो. तेवढयात बसचा ब्रेक लागतो आणि तो भानावर येतो. आज त्या गोष्टीला ५ वर्षे झाली. तरीही त्याच्या डोळ्यातून अश्रू निघत असतात तो ते अश्रू फुसतो. बसमधून उतरतो. त्याला असे वाटत होते. माझ्या प्रेमाची कबुलीच तिला माझ्यापासून दूर घेऊन गेली, "ती केवळ माझ्या प्रेमाच्या कबुलीसाठीच मृत्यूनंतर देखील परत आली होती." " जर त्या दिवशी मी तिला माझ्या प्रेमाबद्दल सांगितलं नसतं तर"... पण तेच ऐकायला तर तिचा जीव माझ्यात अडकून राहीलेला होता.... आदिती.. प्लीज परत ये ना एकदा....

#VT

Post #26

Wednesday, 22 February 2017

माझ्यावर प्रेम करशील ना?

माझ्यावर जेवढे कोणी प्रेम केलं नसेल
तेवढे माझ्यावर प्रेम करशील ना ?

माझ्या प्रत्येक सुख दु:खात
तू माझ्यासोबत असशील ना ?

मला जेव्हा तुझी गरज वाटेल
तेव्हा मला मदतीचा हात देशील ना ?

आपली कितीही भांडण झाली तरी
मला समजून घेशील ना ?

जीवनाच्या वाटेवर माझी
जीवनभर साथ देशील ना ?

माझ्या मनातील प्रेम भावना
मी न सांगता जाणून घेशील ना ?

सांग ना माझ्यासाठी एवढं करशील ना ?

#VT

Post #25

समंजस जोडीदार

"🎙आयुष्यात प्रत्येकाला समंजस जोडीदार लाभावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते🎙". हे जर आपण गृहीत धरले तर ढोबळ मानाने त्या जोडीदारामध्ये हवी असलेली काही वैशिष्ट्ये:
 १. समजूतदार,
२. स्वतः नेहमी आनंदी असणारा,
३. सर्वांशी प्रेमाने वागणारा,
४. तुम्हाला नेहमी खुश ठेवणारा,
५. तुमचा राग सहन करणारा,
६. तुमच्या मित्र परिवाराशी आपुलकीने वागणारा,
७. तुमच्या आवडी निवडी जोपासणारा,
८. तुमच्यावर अतोनात प्रेम करणारा
इत्यादी...
(टीप: वरील यादी अपूर्ण असण्याची पूर्ण शक्यता आहे आणि या यादीशी सर्वच सहमत असतील असे नाही.)

आता ही झाली समंजस जोडीदाराची वैशिष्ट्ये. थोडक्यात सांगायचं झालं तर अतिशय हेवा वाटावा असं त्या जोडीदाराचं व्यक्तिमत्व असावं. पण हीच अपेक्षा प्रत्येकाची असल्यामुळे हाच नियम आपल्यालाही लागू पडायला हवा. आपल्यावर प्रेम करणारी व्यक्तीही कदाचित हिच अपेक्षा करत असेल. मग आपण का नाही स्वतःचे व्यक्तिमत्त्व हेवा वाटेल असे बनवू शकत.  "Nothing is Impossible".

#PS

Post #24

Tuesday, 21 February 2017

असं "मराठी प्रेमपत्र " असतं...

एकदाच होतं... नशिबवानानाचं मिळतं... म्हणूनच जीवापाड जपावं... असं प्रेम असतं...💖

तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा... तिच्या गालावरील खळीतुन खुलतं... असं प्रेम असतं...💗

तुमच्या ह्रदयाची स्पंदनं वाढवते ..... असं प्रेम असतं...💓

जे अंत:करणातून येते... तेच अंत:करणाला जाऊन भिडते...असं प्रेम असतं...💝

आणि तुम्हाला तुमचे प्रेम जपण्यास मदत करतं... असं "मराठी प्रेमपत्र" असत...💌💕


"मराठी प्रेमपत्र" अर्थातच 💝मराठी Love Letter💝

बघत काय बसलात, आत्ताच डाउनलोड करा आणि सामील व्हा प्रेमज्वरात.. हो हो! "प्रेमज्वर" जो सर्वांना हवाहवासा आहे.. मग तुम्ही मागे का? खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि होऊ दे डाउनलोड😎

https://play.google.com/store/apps/details?id=npsquare.marathi.prempatra

Post #23

आयुष्यात एकदातरी प्रेम करून पहावं..

चिंब पावसात मनसोक्त भिजावं
आयुष्यात एकदातरी प्रेम करुन पहावं...

सरींच्या डोहात स्वतःला झोकून द्यावं
हातात हात घेऊन एक होण्याच स्वप्न पहावं ...

फक्त स्वप्न न पाहता ते जगण्याची धमक डोळ्यांत असावी
एक दिवस तू नक्की माझा होशील ही आस मनात रुजावी ...

नाही म्हणता म्हणता नकळत तुझ्यात हरवून जावं
आयुष्यात एकदातरी प्रेम करुन पहावं...

- पियू

Post #22

माझा फक्त तू...

मित्र माझा तू, प्रेम माझे तू ...
शब्द माझे तू, वाक्य माझे तू ...
दिवस माझा तू, रात्र माझी तू ...
स्पर्श माझा तू, सहवास माझा तू ...
स्वप्नात माझ्या तू, स्वप्नातील राजकुमार तू ...
हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात तू ...
मला लागणाऱ्या प्रत्येक उचकीत तू ...
मी घेणाऱ्या प्रत्येक श्वासात हि तू ...
माझ्या आयुष्याची सुरुवात तू ...
आणि आयुष्याचा शेवटही तू ..
मी तुझी आणि ...
माझा फक्त तू आणि तू....

- स्वप्नाली
(मराठी प्रेमपत्र फॅन क्लब)

Post #21

प्रेम💓 संबंधित मराठी स्टेटस

काही निवडक प्रेम💓 संबंधित मराठी स्टेटस 👍

१. नाक उडवून, गाल फुगवून लटकं राग😣 धरून............जेव्हा माझ्यावर रुसुन बसतेस.....खरं सांगु तेंव्हा तु खुप गोड दिसतेस😍...

२. तू चिंब भिजल्यावर तुझ्या गालावरचे थेंब☔ गालावरच राहायला तरसतात, क्षणभर का होईना ते गुरुत्वाकर्षण विसरतात....

३. बघ तुला अजूनही राहवत नाहीए माझं स्टेटस पाहिल्यावाचुन........ मी काय म्हणतो मग बोलूनच टाक ना 💕मनातलं एकदा....

४. #देवाचे#मंदिर असो किंवा #तुटणारा_तारा🌠
#जेव्हा माझे #डोळे #बंद होतील तेव्हा मी फक्त #तुलाच_मागेन

५.  तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो😃 कस सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो😇

६. तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला, सुंदर दान पदरात टाकायला त्याने किती उशीर केला.😏

७. जर तुमचे प्रेम तुम्हाला सोडून जात असेल तर जाऊ द्या... जर ते परतून तुमच्याकडे आले तर ते तुमचे आहे ...😇

८. मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील ...
पण चोरून पाहणाऱ्या हृदयाला 💓काय उत्तर देशील ...

९. तुमच्या चेह-यावरील हसु 😃जेव्हा... तिच्या गालावरील खळीतुन खुलतं... ते प्रेम💕 असतं...

१०. आज ती मला म्हणाली तू मलाच का Choose केलस... मी म्हणालो "दगड गोळा करायची सवय मला नाही .....माझी नजर फक्त Diamond🔶 वर असते ..……

सौजन्य: मराठी स्टेटस (अँड्रॉइड अँप)
https://play.google.com/store/apps/details?id=com.shree.marathi.status

Post #20

Monday, 20 February 2017

माझ्या अबोल भावना

"माझ्या अबोल भावना"

अस वाटतं तिला बोलून टाकावं...
मनातलं वादळ शांत करावं...

पण भीती एकच...
माझी थोडी घाई करण्याची...
आणि ती दूर जाण्याची...

हल्लीच कुठे आमची भेट झाली आहे...
मनात तिची एन्ट्री अगदी थेट झाली आहे...

मला सांगायचं आहे तिला..
कि आयुष्यभर तुझा हात माझ्या हातात हवा आहे...
खूप प्रामाणिक हृदय आहे माझं.. जरी माझा चेहरा तिच्यासाठी नवा आहे...

भीती वाटते
पुन्हा एकदा प्रेमात पडून break up होण्याची... म्हणून हिम्मतही होत नाही आता या प्रेमवीराची...

म्हणून समजून घे मला कि का नाही मनातलं आणू शकलो या ओठांवर... पण प्रयत्न नक्की करेन... पुन्हा एकदा भेटल्यावर...

तसं तिलाही माहित आहे... माझ्या मनात काय आहे... फक्त आयुष्यभराची साथ हवीये... या emotional सागराला...

खूप नशीबवान समजेन मी स्वतःला...
जर तिचं प्रेम असेल माझ्या साथीला...

इतकच सांगायचं आहे मला कि खूप प्रेम आहे या हृदयात ... जे प्रामाणिक पणे तिच्या स्वाधीन करायचं आहे... आणि ही कविताच मदत करेल... माझ्या अबोल भावना तिला कळवायला...

साभार : सागर खारकर.

Post #19

Sunday, 19 February 2017

प्रेम चारोळी #३

😘😘जे आधी ❤ प्रेम होतं
 तेच पुढे हि असेल..!!😓😓
👉👩 तुझ्यातच सुरुवात झाली
आणि 👩👩तुझ्यातच👩👩 शेवट असेल..😘

Post #18

इति लवगुरु - प्रेम विचार #३

खरं प्रेम💘 ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त विचार करता😇....

- इति लवगुरु

Post #17

अजूनही आठवतंय मला

अजूनही आठवतंय मला
तुझं ते चोरून मला पाहणे
आणि माझं लक्ष गेले कि
लगेच नजर दुसरीकडे फिरवणे...

अजूनही आठवतंय मला
तुझं माझ्याकडे येऊन प्रपोज करणे
आणि मी नाही बोली
म्हणून तुझे ते उदास होणे...

अजूनही आठवतंय मला
माझा तुला होकार देणे
आणि त्याचा तुला आनंद होऊन
तुझ्या सर्व मित्रांना पार्टी देणे...

अजूनही आठवतंय मला
मी जवळ नसताना तुझे उदास होणे
आणि मी जरा भेटली कि
लगेच तुझ्या चेहऱ्यावर ते छान हसू येणे...

अजूनही आठवतंय मला
तुझं ते लग्नासाठी मागणी घालणे
आणि मी हा बोलताच
माझ्या घरी येऊन सांगणे...

- वैशाली ठाकूर

Post #16

Saturday, 18 February 2017

प्रेम त्याच्यावरच करा जो आपल्यावर प्रेम करतो

एक कीर्ती नावाची मुलगी सुमित वर खूप प्रेम करयाची. पण सुमित ला हे माहित नव्हते. कीर्ती आणि सुमित चांगले मित्र मैत्रीण होते. सुमित सरितावर प्रेम करायचा आणि तो सरिता बद्दल कीर्ती ला सांगायचा. कीर्ती ला खूप वाईट वाटयचे. तिला माहित होते की तिचे पहिले प्रेम कधीच पूर्ण होणार नाही. पण काही महिन्यानंतर सरिता सुमित ला सोडून जाते. सुमित खूप दु:खात जगत होता. कीर्ती त्याला हसवण्याचा प्रयत्न करायची पण तो नेहमी दुखीच रहायचा. तरी ही कीर्ती त्याला हसवण्याच्या प्रयत्नात होती. सुमित ला सरिता सोडून गेली याचा तिला आनंद न होता. तो तिच्या दुखात आहे ह्याचा तिला त्रास होत होता. ती त्याला धीर द्यायची.

कीर्ती चे हे प्रयत्न पाहून सुमित ला ही कीर्ती आवडायला लागली. कीर्ती ने एकदा धाडस करून सुमित ला विचारले. मला तू आवडतोस माझ्याशी लग्न करशील. सुमित ला ही कीर्ती आवडायला लागली होती म्हणून त्याने ही होकार दिला. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करू लागले.

सरिता परत सुमितच्या आयुष्यात येते आणि त्याला बोलते आता आपण लग्न करूया. तेव्हा सुमित तिला नकार देतो. तो तिला म्हणतो ज्या वेळी मला तुझी जास्त गरज होती त्यावेळी तू मला साथ नाही दिलीस. आता मी फक्त कीर्ती वर प्रेम करतो. सरिता कीर्ती ला जाऊन भेटली. ती तिला म्हणली की, "सुमित आणि माझं पुढच्या महिन्यात लग्न आहे. तर तू नक्की ये" हे ऐकून कीर्ती ला धक्का बसला तिने मनात विचार केला की, सुमित ने वेळ घालवण्या करिता माझ्यावर प्रेम केले होते आणि ती त्याला न विचारता तिच्या गावी जाते. सरिताला चांगली संधी मिळते आणि ती सुमित ला सांगते की कीर्ती तिच्या दुसऱ्या प्रियकरासोबत पळून गेली. सुमित तुटून जातो. त्याला ही असे वाटते की, कीर्ती ने वेळ घालवण्या करिता माझ्यावर प्रेम केले. पण तो हार मानत नाही तो तिला शोधतो. कारण त्याला ती हवी असते. त्याला वाटते की पहिले प्रेम पूर्ण नाही झाले पण मी माझे दुसरे प्रेम नक्की पूर्ण करणार.  एके दिवशी त्याच्या मित्र त्याला सांगतो की ती आमच्या गावात राहते. तेव्हा तो तिच्या गावात जातो आणि जेव्हा तिला तो दिसतो तेव्हा ती रागाच्या नजरेने त्याला बघून त्याच्या समोरून जाते. तो तिला थांबण्याच्या पर्यंत करतो. तो तिला म्हणतो, "काय झाल अचानक सोडून का गेलीस? माझे प्रेम अपुरे पडले का जे दुसऱ्या सोबत पळून आलीस.” ती त्याला म्हणते की, "तू हे स्वतः केलेस आणि मला सांगतोस”. तो म्हणतो, "मी कधी केले. तूच अर्ध्यावर सोडून आलीस.” अशा वादावादीत त्यांना कळते की हे सगळं सरिताने केले. तेव्हा दोघांच्या ही डोळ्यात अश्रू येतात. तेव्हाच दोघे एकमेकांना वचन देतात कोणीही मधी आले तरी आपण एकमेकांत असलेला विश्वास तुटू द्यायचा नाही.


साभार :- मिष्टी जानु

Post #15

Friday, 17 February 2017

आई आणि तो

आतापर्यंत आपण प्रेम या विषयाबद्दल खूप लिहिलं, वाचलं आणि पाहिलं. प्रियकराचं आपल्या प्रेयसीवर असलेलं प्रेम, आईचं आपल्या मुलांवर असलेलं प्रेम, पती-पत्नीचं प्रेम, बहीण-भावाचं प्रेम, इत्यादी आणि अशाच अनेक रुपात असलेलं प्रेमाचं महत्व आपण जाणून आहातच.

या सर्वांना गृहीत धरूनच आज आपण थोड्या वेगळ्या विषयाला हात घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. मुळातच हा विषय थोडा भावनिक असणं ही या विषयाची गरज आहे.

वयाच्या साठीत असलेली आई आणि वयाच्या पस्तिशीत असलेल्या तिच्या मुलाचं नातं या संदर्भात आपण आज इथे भाष्य करायचा प्रयत्न करणार आहोत. पस्तिशीत असलेल्या मुलाचा कळ हा मुख्यतः पैसे कमावणं, संसार सांभाळणं इत्यादी बाबतीत असणं साहजिकच आहेत. पण त्या मुलाचं त्याच्या आईवरही खूप प्रेम आहे. पण त्याची आई आता आजारी असते. तिला पहिल्यासारखी उठबस आता नाही झेपत. तिच्या तरुणपणी तिने खूप कष्ट केले होते. आपल्या मुलाला तिने स्वतःच्या पायांवर उभं राहण्यास मदत केली होती. त्या मुलालाही याची जाणीव आहे. तो तिच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च, तिचं खाणंपिणं सर्व अतिशय उत्तम प्रकारे सांभाळून असतो.

असेच दिवस आनंदात जातात पण आता त्याच्या आईला बिछान्यावरून उठता येत नसते. तिचे चालणं आता फक्त टॉयलेटला जाण्यापुरतं मर्यादित झालं होतं. तिची ही अवस्था पाहून मुलालाही वाईट वाटू लागले. तो तिची अतिशय उत्तम डॉक्टरकडे जाऊन तपासणी करतो.  तो तिला प्रोत्साहन देऊ लागला आई तू प्रयत्न कर तू बरी होशील. पण कधी कधी हे तो हे प्रेमानं सांगायचं आणि खूप वेळा चिडून सांगायचा. पण त्याला हे नव्हते माहीत कि आईला त्याचे प्रोत्साहन नको होते त्याचा  आधार हवा होता. तिला असं वाटत होतं कि मला माझ्या मुलानं धरून चालवावं, जसं लहानपणी मी त्याला चालवत होती. माझ्या जवळ बसावं, माझ्या डोक्यावरून हात फिरवावा, मायेनं मला जवळ घ्यावं, जसं मी तो आजारी असताना करायची. पण तिला हे सांगता येत नव्हतं; कारण तो busy होता या संसाराच्या रहाटगाड्यात. आधुनिक काळातील श्रावणबाळ होण्यासाठी कुणाला वेळ आहे या जगात.

आतातर तिचं आजारपण इतकं वाढलं कि तिला आता टॉयलेट ला सुद्धा जाता येईना. तिचं एवढं आजारपण बघून त्याने तिला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. डॉक्टरांनी सांगितलं कि आता हा आजार शेवटच्या टप्प्यात आला आहे. तो वैतागला डॉक्टरांवर, बोलला हे कसं शक्य आहे, मी तर सर्व उपचार केले तरी हे असं कसं होऊ शकतं. डॉक्टर निरुत्तर होते.

त्याची आई इथं शेवटची घटका मोजत होती, तो आईजवळ येऊन बसला, आईला विचारलं आई मी माझे सर्व प्रयत्न केले होते माझे काही चुकलं का? माहित नाही मी कुठं कमी पडलो? आईचं हृदय ते ... आई बोलली.. नाही रे माझ्या मुला तू कुठेच कमी नाही पडलास. तू मला भरभरून सुख दिलंस.

इतकं बोलून त्या आईनं तीचे डोळे मिटले होते... कायमचे...

#PS

Post #14

प्रेम चारोळी #२

नजरेत नजर मिसळायला
कॅण्डललाइटचं टेबल लागत नाही
अन एकरुप झालेल्या जीवांना
वॅलेनटाइन चं लेबल लागत नाही...
#sk

Post #13

Thursday, 16 February 2017

असावं कुणीतरी

असावं कुणीतरी आपल्या आयुष्यात
आपल्यावर खूप प्रेम करणार..

आपण कितीही रागवलो तरी
आपल्याला समजून घेणार...

असावं कुणीतरी आपल्या आयुष्यात
लाडाने पिल्लू, शोना, बच्चा बोलणार...

आपण रडत असल्यावर
मिठीत घेऊन शांत करणार..

असावं कुणीतरी आपण दु:खी झाल्यावर
आपली दु:खे वाटून घेणारा...

मनातलं काही न सांगता
मनातलं सर्व काही ओळखणारा...

असावं कुणीतरी आपल्या वाढदिवसाच्यादिवशी
सर्वात पहिला विष करणारा

लाँगड्राईव्ह नको पण
जवळच कुठेतरी फिरवून आणणारा...

असावं कुणीतरी घरी येऊन
लग्नासाठी मम्मी पप्पाजवळ मागणी घालणारा..

माझ्यावर कोणताही प्रसंग आला तरी
माझी साथ कधी न सोडणारा....

खरचं असावं असं कुणीतरी...⁠⁠⁠⁠

- वैशाली ठाकूर

Post #12

Wednesday, 15 February 2017

हॅपी इंडिंग😊

पावसाचे ☔दिवस होते ते.... असाच एरिया मध्ये फिरत 🏃 होतो. तेव्हा मित्रांनी सांगितलं, आपल्या बाजूच्या गल्लीत एक झक्कास मुलगी 👸 राहायला आली आहे. हे ऐकून मी खूप खुश झालोना भाऊ. सर्व काम सोडून आधी तिलाच बघायला 🏃 गेलो आणि बघितलं तर बघतच 👀 राहिलो ना भाऊ. बघितल्या बरोबर मनात घर करून बसली, जेव्हा माझ्याकडे बघून 😊हसली ती. आता तर माझं एकच काम असायचं. रोज सकाळ संध्याकाळ तिलाच बघत 👀बसायचं.

कधी दिसली नाय तर रात्री झोप नाही यायची. माझी नजर तिच्या एका झलक साठी तरसायची. आता माझ्या मित्रांना मला शोधायचा त्रास नसायचा, कारण माझा अड्डाच तिच्या घरासमोर असायचा.

एक दिवस ती मला रडताना 😢 दिसली. माझ्याकडून राहवलं नाही जाऊन तिचे डोळे पुसले ती शॉक झाली. आणि म्हणाली "अरे कोण तू?". मी पण थोडा घाबरलो आणि मनात विचार केला बोलू का हिला "तुझा होणारा नवरा" असं. पण मी माझ्या भावना आवरल्या आणि म्हणालो मी तुझ "एकतर्फी प्रेम"💃. ती रागातच😡 म्हणाली मग ते एकतर्फीच राहूदे कारण मी नाही करू शकत.

मला थोडं वाईट 😢वाटलं मग मी पण तिला बोललो अग अस नको करू मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय. ती म्हणाली मला माहित आहे तुझ्यासारख्या मुलांचं फक्त शरीरावरच प्रेम असते. तू अस कर, माझ्याशिवाय जगू नाही शकत ना, तर मग मर. मी हसलो 😊आणि बोललो "तुझ्यावर तर मी नेहमीच प्रेम करत राहणार आणि आजपासून कधी तुझ्या वाटेला येणार नाही. माझं तुझ्या शरीरावर प्रेम नाही हे समजल्यावर जेव्हा तूला पश्चाताप होईल तेव्हा मात्र प्रेमाच्या शोधात तू माझ्याजवळ येशील". एवढं बोलून तिथून निघालो खर पण नंतर विचार करायला लागलो.

पुढे काय २ महिने झाले अजून आली नव्हती ती. शेवटी एक idea केली ती बोलली होती ना माझ्याशिवाय जगु नाही शकत तर मर, मग विचार केला एकदा मरूनचं बघतो ना येते का नाही ते. तुम्ही नका सिरियस होऊ मी फक्त मरण्याचं नाटक करणार होतो. माझे सर्व मित्र सुद्धा माझ्या या Idea मध्ये सहभागी झाले.

तिरडी तयार झाली, मी त्यावर झोपलो, मित्र रडायला 😢😭लागले. आई शप्पथ!!! खुप हसायला येत होत पण तेवढिच भीति वाटत होती एवढं करूनही ती आली नाही तर ? वातावरण शांत होतं आणि अचानक रडण्याचा आवाज आला बघितल तर काय माझ्या Dream Girl चा आवाज होता,  ती रडत रडत धावत माझ्या जवळ आली माझ्या छातीवर डोकं ठेवून रडू😢 लागली. मी पण तुझ्यावर प्रेम करू लागलेली उद्या येणारच होती मी माझी भावना व्यक्त करायला आणि तू मला सोडून गेलास.

भावा एवढं ऐकून कंट्रोल नाही झाल ना मला, मी लगेच उठून बसलो आणि म्हणालो माझ्या प्रेमाची जाणीवच तुला करुण द्यायला हा ड्रामा केला होता. मग काय आम्ही दोघ  एकमेकांना मीठी मारुन रडू लागलो आणि आमचं प्रेम👩‍💕‍👨 पुढे चालू झाल.

हॅपी इंडिंग...

- विकी
(मराठी प्रेमपत्र फॅन क्लब)

Post #11

धुंद त्या सायंकाळी

धुंद त्या सायंकाळी
सहज तुझी आठवण आली ...
अन् गुलाबाची कळी 🌹
खुलली माझ्या गालावरी ......😊

न कळे कसे सांगू तुला हे
तूच माझ्या मनात दिवसरात्र ...
तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी
फक्त आणि फक्त 'मराठी प्रेमपत्र'....💌💖

-पियू

"मराठी प्रेमपत्र" म्हणजेच मराठी Love Letter....
डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..

https://play.google.com/store/apps/details?id=npsquare.marathi.prempatra

Post #10

प्रेमपत्र नाही हमीपत्र...

प्रिये,
       आज मी ठरवलं आहे कि तुला एक प्रेम पत्र लिहायचय. म्हणूनच सुरुवात सुद्धा Dear ने न करता 'प्रिये' अशी केली आहे. प्रेम पत्र लिहिण्यास कारण इतकच कि माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे💝. अगदी जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. मराठीत समजत नसेल तर इंग्रजी मध्ये सांगतो I Love You.  हे मी या आधीही तुला खूप वेळा सांगितले आहे SMS💬 च्या माध्यमातून. खर सांगू तर इकडून तिकडून कॉपी करून ते SMS तुला फॉरवर्ड केलेलं आहेत. पण नेहमी वाटायचं कि प्रेमाचा इजहार प्रेम पत्राने करावं. कदाचित तू म्हणशील हि "तू तर लटकलास!!!"; पण ते हि तितकंच खरं आहे. नाही म्हटलं तरी तू आहेसच तेवढी गोड.

      पूर्वीच्या काली प्रेमात पडलेली माणसं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेम पत्रांचाच वापर करायची. सैराट मध्ये सुद्धा परश्या आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी पत्रांचं माध्यम म्हणून उपयोग करतो. म्हणून मी हि ठरवलं कि तुला Love Letter लिहावं.

     बघायला गेलं तर मी हे खूप आधी करायला हवे होते. पण social chatting च्या नावाखाली हे सर्व राहून गेलं. Smileys send केल्यामुळं तुझ्या गालावर पडलेली खळी फक्त काही सेकंदच राहणार आहे हे एव्हाना मी जाणलं आहे. मला तुझं हसणं हवं आहे ते हि अगदी मनसोक्त. तुझ्या काळ्याभोर डोळ्यात मला स्वतःला पाहायचं आहे. जसं पुस्तक वाचताना आपण ते पुस्तकातील जग आपल्या डोळ्यांत साठवतो, तसेच हे प्रेमपत्र वाचताना तू मला नक्की डोळ्यांत साठवशील. तू माझ्या सोबत असलेला प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी एक अमूल्य ठेवा आहे. त्या प्रत्येक क्षणाला साक्षी ठेवून माझे हे प्रेमपत्र तुला समर्पित.

"हे प्रेमपत्र नसून एक हमीपत्र आहे माझ्या तुझ्यावरल्या प्रेमाचं"

-तुझाच

#PS

Post #9

वयानुसार मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील मुलीच्या नाजूक भावना

वयानुसार मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील मुलीच्या नाजूक भावना

१८ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, ज्युनिअर
कॉलेजच्या निरोप समारंभात त्याने
मारलेली मिठी आणि खारट अश्रू पीत
पुन्हा भेटण्याची ठेवलेली गोड अपेक्षा.

२१ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे,
माझ्या कॉलेज ची सहल गेलेल्या ठिकाणी त्याने
त्याचे कॉलेज बुडवून अचानक दिलेली भेट.

२६ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, गुढग्यावर
बसून हातात गुलाबाचे फुल घेऊन त्याने
मला लग्ना साठी केलेली मागणी.

३५ वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, मी दमले आहे हे
बघून त्याने स्वतः केलेला स्वयंपाक.

५० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे,
तो आजारी असून, बरेच दिवस बेड वरच
असून सुद्धा मला हसवण्यासाठी त्याने
केलेला विनोद.

६० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, त्याने
शेवटचा श्वास घेताना पुढल्या जन्मात लवकरच
भेटण्याचे दिलेले वचन.

पाहताक्षणी एखादी व्यक्ति आवडणं हे 'आकर्षण' असतं...
परत पहावसं वाटणं हा'मोह'असतो...
त्या व्यक्तिच्या जवळून जाण्याची इच्छा असणं ही 'ओढ' असते..
त्या व्यक्तिला जवळून जाणणं हा 'अनुभव' असतो...
आणि त्या व्यक्तिला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं "प्रेम"💕 असतं...

-सागर
(मराठी प्रेमपत्र फॅन क्लब)

Post  #8

मराठी प्रेमपत्र - तू हि रे माझा मितवा

मराठी प्रेमपत्र - तू हि रे माझा मितवा
Post #7

असा का आहेस तू?

आयुष्याच्या वळणावर मला तुझी गरज भासली, त्या वेळी तू मला नेहमी साथ दिलीस. माझे दु:ख स्वत:चे दु:ख म्हणून समजून घेतलेस. माझा प्रत्येक त्रास तू सहन करून घेतलास. पण तू तुझ्या वेदना मला कधीचं सांगत नाही. तुझे दु:ख तू का लपवतोस.. असा का आहेस तू ?

     आपण एकमेकांवर प्रेम करतो ना.. मग तू माझे दु:खचं का घ्यावे, मला सुद्धा तुझे दु:ख सहन करायला एक संधी दे ना. तू म्हणतोस मी हळवी आहे, मला त्रास सहन होणार नाही, पण नेहमी आनंद मिळेल असे नाही ना. कधी कधी दु:ख पण सोसावे लागते. मग तू ही तसचं समजून तुझ्या वेदना माझ्या सोबत व्यक्त कर ना... मला खूप आवडेल जेव्हा तू तुझे दु:ख माझ्यासमोर व्यक्त करशील. तुला भीती वाटते का, कि मी तुझे दु:ख सहन करू शकणार नाही. असं नाही आहे, मी तुला सुद्धा तशीच साथ देईन जशी तू मला माझ्या दु:खामध्ये देतोस. प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणे ना? मग हे तुला का नाही समजत. तू माझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू तुझे कर्तव्य ही पार पाडतोस. मग मला सुद्धा एकदा संधी दे ना माझं कर्तव्य पार पडण्याची. मी या संधीची वाट पाहतेय.

साभार :- मीष्टी जानू

Post #6

प्रेम चारोळी #१

नजरेत नजर मिसळायला
कॅण्डललाइटचं टेबल लागत नाही
अन एकरुप झालेल्या जीवांना
वॅलेनटाइन चं लेबल लागत नाही...
#sk

Post #5

प्रेम इथेच थांबत नाही

"प्रेम इथेच थांबत नाही"

आजच्या युगातील प्रेम हे दिसण्यावरून होते हे नक्कीच. पण त्या व्यक्तीचा स्वभाव बघून ही प्रेम होते हे जरा कमीच आहे.

सीमा आणि समीरचे छान चालू होते. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे. दोघ ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. ते दोघं एकत्र शाळेमध्ये असल्यापासून मित्र होते आणि त्यांच्या कॉलेजवर्षामध्ये त्यांना एकमेकांवर प्रेम झाले आणि आता सुद्धा डिग्री कॉलेज मध्ये एकत्र आहेत.  सीमा समीरच्या करीयर बाबतीत जरा जास्त सिरीयस होती. कारण तिला वाटत होतं की त्याने प्रेमामुळे करीयर त्याग न द्यावा. म्हणून ती त्याला नेहमी त्यांच्या भविष्याबाबत सुचवायची.

दोघांना ही पुढे डिग्री मिळते दोघेही छान मार्कांनी उतीर्ण होतात. आता दोघांनी ठरवले होते की आपल्या नात्याबद्दल घरी सांगावे आणि लग्न करून सेटल व्हावे. दोघे ही घरी सांगतात. दोघांचे आई वडील ही राजी होतात. आता फक्त बाकी होतं ते जॉब बघून सेटल व्हायचं.

पुढे समीरला एक जॉब ऑफर येते. तो खूप खुश होतो आणि तो इंटरव्यू करिता जॉबला जातो. त्याला जॉब ही मिळतो. सगळ सुरळीतपणे चालू होतं. पाच सहा महिने उलटून जातात. त्याने त्याच्या लग्नासाठी सेविंग सुद्धा केली असते. आता फक्त बाकी होतं ते लग्न ठरवायचं.

तो सीमाला खूप काही बोलतो आपण असे घर घेऊ आपण तिथे दोघेच राहू आणि विकेंड ला आईबाबा कडे येऊ मग तुझे आई बाबा आणि माझे आई बाबा आणि आपण दोघ मस्त विकेंड एन्जोय करू. हे ऐकून सीमा ही खुश होते. तिला ही तसेच हवे होते.

पण एकदिवस समीर ला बॉस बोलवतात त्याला कामासाठी बाहेरगावी जावे लागेल असे बॉस त्याला सुचवतात. तो ही घरच्यांची आणि सीमाची परवानगी घेतो आणि बॉसला होय असं उत्तर देतो. एक महिन्या करिता बाहेरगावी जाणार आहे म्हणून तो तिला एक पूर्ण दिवस वेळ देतो. त्या दिवशी ते लोकं एका समुद्र किनाऱ्यावर जातात आणि समुद्रकिनाऱ्यावर एकमेकांच्या हातात हात घालून बसलेले असतात. समीर सीमाला म्हणतो, “मला एक महिना सुद्धा एक वर्षा सारखं वाटत आहे ग. आपण लहानपणापासून सोबत आहोत आणि मी तुझ्यापासून एवढे दिवस लांब जाईल अशी वेळ सुद्धा आली नव्हती कधी." सीमा म्हणते, “अरे यात वाईट का मानून घेत आहेस, फक्त एक महिनाच ना.. नंतर परत आपण एकत्र राहणार आणि आता तर लग्न ही होणार आहे आपलं. मग आपण एकत्रचं राहणार.. हो ना आता मस्त एक स्माईल दे. मग तो तिच्या मांडीवर डोक ठेवून थोडावेळ तेथे झोपी जातो. सीमा त्याची केसं कुरवाळत त्याला म्हणते, “की उद्या मी नाही येणार तुला सोडायला.. कारण मला रडू येल तुला जाता वेळी बघताना.. तू जेव्हा येशील ना इंडियामध्ये तेव्हा मी तुला इथे या बीच वर भेटेन. Promise कर तू पहिला मलाच भेटायला येशील. तो म्हणतो, “हो".

तो एक महिन्यासाठी जात होता, म्हणून त्याने तेथील सीम नाही घेतले. तो तिथून एका मित्राच्या फोन वरून घरची आणि तिची खबर घेत होता. पण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो खूप व्यस्त असल्याने त्याला घरची आणि तिची खबर काही घेता आली नाही. जेव्हा तो इंडियात आला तेव्हा प्रथम तो समुद्रकिनारी गेला तिला भेटण्यासाठी. ती तिथे त्याची वाट बघत बसली होती. तो आला आणि पाठून तिचे डोळे मिटले.
ती, “आलास, किती उशीर मी किती वाट बघतेय तुझी.. मला जायचं आहे ना उशीर होईल..”
तो, “सॉरी ग पिल्लू... कशी आहेस मला माफ कर मी गेले सात दिवस तुझ्याशी बोललो नाही.”
ती, “असू दे तू आलास ना आता काही टेशंन नाही..”
तो, “तू नक्की रागवली नाही ना... हशशSS मला वाटला तू भरपूर रागवली असणार..”
ती, “नाही रे मी का रागवू तुझ्यावर..”
तो, “पिल्लू तू थांबशील का इथे जरा वेळ, मी माझे सामान घरी ठेऊन येतो पटकन आणि आईबाबांना फक्त चेहरा दाखवून, लगेच येतो... तू थांब मग आपण खूप बोलू...
ती, “हो..
तो घरी जातो तेव्हा घराला कुलूप असते.. तेव्हा त्याला बाबांचा फोन येतो..
बाबा, “कुठे आहेस आलास का ?
तो, “हो तुम्ही कुठे आहात ?
बाबा,” सीमाच्या घरी तू ये लवकर इथे.
तो,” हो आलोच.

( तो सामान बाजूच्या काकींकडे देतो आणि जातो. )
तिच्या घरी जाताचं सगळे शांत होते.. मला वाटलं मला काही तरी Surprise मिळणार आहे. जरा पुढे गेलो तर आई रडत रडत मला मिठी मारते.
आई, “सीमा आता आपल्यात नाही राहिली..”
तो, “काय आई ?? हो का.. बस आता.. थट्टा पुरे झाली.. मी आत्ताच तिला भेटून आलोय. अजून ती माझी वाट पाहत आहे तिकडे.. मला तुम्हाला भेटून परत जायचे आहे तिकडे..
( घरातील सगळे आश्चर्य होतात.... समीरच्या आईला कळले होते की आता आपल्या मुलाला खूप जोराचा धक्का बसलेला आहे म्हणून तो असे काही तरी बोलत आहे.. सीमा चे अंतिमसंस्कार बाकी होते. त्याचं क्षणी हॉस्पिटल मधून सीमाची बॉडी घरी आणली जाते.. समीर पाहत्या क्षणी रडू लागतो.. तो आईला सांगतो की मी आत्ताच तिला भेटून आलो आहे आई.. ती समुद्रकिनारी माझी वाट पाहत आहे.. आईला त्याचे दु:ख बघवत नाही.. ती त्याला सीमा सोबत काय झाले ते सांगते..)
आई, “काल जेव्हा सीमा अंघोळीला जात होती तेव्हा पाणी गरम करण्यासाठी तिने हिटर टपात टाकले होते.. तेव्हा अचानक लाईट गेली.. लाईट गेल्यामुळे सीमा हिटर काढत होती. जेव्हा तिने हिटर हातात घेतले तेव्हा अचानक लाईट आली आणि त्या हिटरचा शॉक तिला लागला आणि ती थोड्या दूर वर उडून पडली आणि तिच्या डोक्याला मार लागला आणि ती तेथेच मरण पावली.

(हे सगळं ऐकून समीर खूप दुखावला. त्याला कळून चुकले होते की ती मरून सुद्धा माझ्यासाठी तेथे आली होती.. तो धावत परत त्या समुद्राकिनाऱ्यावर जातो. त्याला ती तेथे दिसते आणि एक मस्त स्माईल देते. तो धावत जातो तिच्याकडे. त्याच्या मागे लगेच त्याचे आईबाबा आणि सीमाचे आईबाबा येतात.)

तो, “नको ना जाऊ मला सोडून.. तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी तुला ठाऊक आहे ना..
ती, “माझ्यासोबत इथे बस आधी...
(तो बसतो...)
ती, “ हो मला माहित आहे.. आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही.. म्हणून तर मी देवाशी ही लडणार आहे. त्याला म्हणेल माझ्या पिल्लूला पाहण्यासाठी मला महिन्यातून एक दिवस देत जा. नेहमी मी तुला इथेच मिळेल.. महिन्याच्या अखेरी तू मला इथे भेटायला येत जा...
तो, “मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय.... नको जाऊस मला सोडून प्लीज. नाही तर मला ही घेऊन जा तुझ्यासोबत..
ती, “असं नाही बोलायचं... आईबाबांना कोण सांभाळेल. त्यांच्याकडे आता फक्त तूच एक आधार आहे.. आणि माझ्या आईबाबांना ही सांभाळशीलना.. मला वचन दे..
तो,” हो.. मी त्यांना सांभाळील..
ती, “ चल मग मी निघते..
तो, “ पिल्लू थोड्यावेळ थांब ना... मला तुझ्या कुशीत एकदा झोपायचे आहे...
ती, “ ते शक्य नाही... मला घायचे असले तरी मी नाही घेऊ शकत तुला कुशीत.. मी निघू आता..
तो, “ पिल्लू निघते नाही बोलायचं येते बोलायचं... तू येशील ना इथे मला भेटायला..
ती, “ हो

( ती त्याला गोड स्माईल देते आणि निघून जाते... हा नेहमी तिला महिन्याच्या शेवटी भेटायला जायचा. त्याला तिची सवय झाली होती...समीर आता मानसिक रोगी झाला होता.. त्याला तिची सवय झाली होती.. महिन्याचे सर्वे दिवस तो एका कोपऱ्यात तिचा फोटो घेऊन बसायचा आणि वेड्यासारखा वागायचा.. पण महिनाअखेर आली की तो बरोबर त्या समुद्रकिनाऱ्यावर जायचा... ती त्याला भेटायला यायची... अजून पर्यंत कोणी तिला पहिले नव्हते तो एकटाच बडबड करत बसायचा.. डॉक्टर ही म्हणाले होते.. जीत पर्यंत ती त्याचासोबत असेल तीत पर्यंत तो चांगला वागेल आणि नंतर तो परत त्याच्या त्याच अवस्थेत येईल. कारण त्याचा एकटेपणा त्याला त्या आजाराकडे खेचून घेऊन जातो. जेव्हा ती त्याचासोबत असते तेव्हा तो त्याचा एकटेपणा विसरून परत नॉर्मल होतो. )

कोण म्हणते मेल्यानंतर ही प्रेम अधुरे राहते सीमा आणि समीरचे प्रेम अजून ही तसेच आहे.

साभार:  मिष्टी जानू

Post #4

इति लवगुरु - प्रेमविचार #२

जी व्यक्ती तुमच्या वाईट क्षणात तुमच्यासोबत होती, फक्त त्या व्यक्तीला तुमच्या चांगल्या क्षणात राहण्याचा जास्त अधिकार आहे.

- इति लवगुरु

Post #3

Tuesday, 14 February 2017

इति लवगुरु - प्रेमविचार #१

तिला एका वर्षांनंतर सांगण्यापेक्षा पहिल्याच भेटीत सांगा, कि तुम्ही तिच्या प्रेमात पडले आहात. 😎

- इति लवगुरु

Post #2

प्रेम 💘दिवस म्हणजे??

विकिपीडिया मध्ये दिलेल्या माहितीनुसार-
"वेलेंटाइन दिवस" किंवा "संत वेलेंटाइन दिवस" हा एक असा दिवस आहे जो जगभरात १४ फेब्रुवारी ला साजरा केला जातो. इंग्रजी बोलणाऱ्या बहुतेक देशांमध्ये हा एक पारंपरिक दिवस आहे. या दिवशी प्रेमी युगल एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमाचा इजहार वेलेंटाइन कार्ड🎊, फूल🌹 किंवा मिठाई आणि चोकॉलेट्स🍫 देऊन करतात.

Valentine डे साजरा करावा किंवा करू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. "खर प्रेम करणारे प्रत्येक दिवस #प्रेम💘 दिवस म्हणून साजरं करतात". खूप कमी लोकांना हे शक्य होतं. पण ९९% लोकांच्या आयुष्यात असं नाही होत. प्रेम करणं आणि प्रेम निभावणं यात खूप अंतर आहे. त्याचं किंवा तीच रागावनं 😣तुम्हाला सहन करता आलं पाहिजे. प्रेमात संयम हवा, समजूतदारपणा हवा. जर समोरच्या व्यक्तीचा कोणत्या गोष्टीला नकार असेल तर तो तुम्ही मोठ्या मनानं मानायला हवा. जर आपल्या चुकीच्या वागण्याने तुमच्या प्रिय व्यक्तीस जर त्रास झाला असेल तर sorry बोलण्यास वर्ष लावू नका😊. कधी कधी तुमची चूक जरी नसली तरी sorry बोलण्यात काही हरकत नाही😉.

जसं म्हणतात लग्न ही आयुष्यभराची commitment असते; तसंच खरं प्रेम ही एक अशी commitment आहे जी पुढे त्या प्रेमी युगुलांना पवित्र अशा समजल्या जाणाऱ्या लग्न या नात्या मध्ये रूपांतरित करायची असते. इथं मग प्रश्न येतो arranged marriage करणाऱ्यांचा!! प्रेम विवाह असो किंवा arranged, दोन्ही खेपेस समंजसपणे प्रेम टिकवून ठेवून ते अजून वृद्धिंगत कसे करता येईल याचा विचार करणे हे जास्त महत्वाचे. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक दिवस प्रेम दिवस साजरा करायचा प्रयत्न करा.

- इति लवगुरु

Post #1