आतापर्यंत आपण प्रेम या विषयाबद्दल खूप लिहिलं, वाचलं आणि पाहिलं. प्रियकराचं आपल्या प्रेयसीवर असलेलं प्रेम, आईचं आपल्या मुलांवर असलेलं प्रेम, पती-पत्नीचं प्रेम, बहीण-भावाचं प्रेम, इत्यादी आणि अशाच अनेक रुपात असलेलं प्रेमाचं महत्व आपण जाणून आहातच.
या सर्वांना गृहीत धरूनच आज आपण थोड्या वेगळ्या विषयाला हात घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. मुळातच हा विषय थोडा भावनिक असणं ही या विषयाची गरज आहे.
वयाच्या साठीत असलेली आई आणि वयाच्या पस्तिशीत असलेल्या तिच्या मुलाचं नातं या संदर्भात आपण आज इथे भाष्य करायचा प्रयत्न करणार आहोत. पस्तिशीत असलेल्या मुलाचा कळ हा मुख्यतः पैसे कमावणं, संसार सांभाळणं इत्यादी बाबतीत असणं साहजिकच आहेत. पण त्या मुलाचं त्याच्या आईवरही खूप प्रेम आहे. पण त्याची आई आता आजारी असते. तिला पहिल्यासारखी उठबस आता नाही झेपत. तिच्या तरुणपणी तिने खूप कष्ट केले होते. आपल्या मुलाला तिने स्वतःच्या पायांवर उभं राहण्यास मदत केली होती. त्या मुलालाही याची जाणीव आहे. तो तिच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च, तिचं खाणंपिणं सर्व अतिशय उत्तम प्रकारे सांभाळून असतो.
असेच दिवस आनंदात जातात पण आता त्याच्या आईला बिछान्यावरून उठता येत नसते. तिचे चालणं आता फक्त टॉयलेटला जाण्यापुरतं मर्यादित झालं होतं. तिची ही अवस्था पाहून मुलालाही वाईट वाटू लागले. तो तिची अतिशय उत्तम डॉक्टरकडे जाऊन तपासणी करतो. तो तिला प्रोत्साहन देऊ लागला आई तू प्रयत्न कर तू बरी होशील. पण कधी कधी हे तो हे प्रेमानं सांगायचं आणि खूप वेळा चिडून सांगायचा. पण त्याला हे नव्हते माहीत कि आईला त्याचे प्रोत्साहन नको होते त्याचा आधार हवा होता. तिला असं वाटत होतं कि मला माझ्या मुलानं धरून चालवावं, जसं लहानपणी मी त्याला चालवत होती. माझ्या जवळ बसावं, माझ्या डोक्यावरून हात फिरवावा, मायेनं मला जवळ घ्यावं, जसं मी तो आजारी असताना करायची. पण तिला हे सांगता येत नव्हतं; कारण तो busy होता या संसाराच्या रहाटगाड्यात. आधुनिक काळातील श्रावणबाळ होण्यासाठी कुणाला वेळ आहे या जगात.
आतातर तिचं आजारपण इतकं वाढलं कि तिला आता टॉयलेट ला सुद्धा जाता येईना. तिचं एवढं आजारपण बघून त्याने तिला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. डॉक्टरांनी सांगितलं कि आता हा आजार शेवटच्या टप्प्यात आला आहे. तो वैतागला डॉक्टरांवर, बोलला हे कसं शक्य आहे, मी तर सर्व उपचार केले तरी हे असं कसं होऊ शकतं. डॉक्टर निरुत्तर होते.
त्याची आई इथं शेवटची घटका मोजत होती, तो आईजवळ येऊन बसला, आईला विचारलं आई मी माझे सर्व प्रयत्न केले होते माझे काही चुकलं का? माहित नाही मी कुठं कमी पडलो? आईचं हृदय ते ... आई बोलली.. नाही रे माझ्या मुला तू कुठेच कमी नाही पडलास. तू मला भरभरून सुख दिलंस.
इतकं बोलून त्या आईनं तीचे डोळे मिटले होते... कायमचे...
#PS
Post #14

No comments:
Post a Comment