प्रिये,
आज मी ठरवलं आहे कि तुला एक प्रेम पत्र लिहायचय. म्हणूनच सुरुवात सुद्धा Dear ने न करता 'प्रिये' अशी केली आहे. प्रेम पत्र लिहिण्यास कारण इतकच कि माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे💝. अगदी जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. मराठीत समजत नसेल तर इंग्रजी मध्ये सांगतो I Love You. हे मी या आधीही तुला खूप वेळा सांगितले आहे SMS💬 च्या माध्यमातून. खर सांगू तर इकडून तिकडून कॉपी करून ते SMS तुला फॉरवर्ड केलेलं आहेत. पण नेहमी वाटायचं कि प्रेमाचा इजहार प्रेम पत्राने करावं. कदाचित तू म्हणशील हि "तू तर लटकलास!!!"; पण ते हि तितकंच खरं आहे. नाही म्हटलं तरी तू आहेसच तेवढी गोड.
पूर्वीच्या काली प्रेमात पडलेली माणसं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेम पत्रांचाच वापर करायची. सैराट मध्ये सुद्धा परश्या आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी पत्रांचं माध्यम म्हणून उपयोग करतो. म्हणून मी हि ठरवलं कि तुला Love Letter लिहावं.
बघायला गेलं तर मी हे खूप आधी करायला हवे होते. पण social chatting च्या नावाखाली हे सर्व राहून गेलं. Smileys send केल्यामुळं तुझ्या गालावर पडलेली खळी फक्त काही सेकंदच राहणार आहे हे एव्हाना मी जाणलं आहे. मला तुझं हसणं हवं आहे ते हि अगदी मनसोक्त. तुझ्या काळ्याभोर डोळ्यात मला स्वतःला पाहायचं आहे. जसं पुस्तक वाचताना आपण ते पुस्तकातील जग आपल्या डोळ्यांत साठवतो, तसेच हे प्रेमपत्र वाचताना तू मला नक्की डोळ्यांत साठवशील. तू माझ्या सोबत असलेला प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी एक अमूल्य ठेवा आहे. त्या प्रत्येक क्षणाला साक्षी ठेवून माझे हे प्रेमपत्र तुला समर्पित.
"हे प्रेमपत्र नसून एक हमीपत्र आहे माझ्या तुझ्यावरल्या प्रेमाचं"
-तुझाच
#PS
Post #9

No comments:
Post a Comment