दिनविशेष: २७ फेब्रुवारी- जागतिक मराठी भाषा दिवस
मराठी साहित्याचा मानदंड लेखक, नाटककार, कविवर्य वि.वा.शिरवाडकरांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
या आपल्या अमृततुल्य मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याचे काम हे मनाने मराठी असलेल्या प्रत्येक माणसाने करणे जरुरी आहे.
आजघडीला ‘मोबाइल’ वरून आपण किमान १०-१५ तरी लघुसंदेश (SMS किंवा Chat) दररोज पाठवतो. बहुतेकवेळा हे संदेश इंग्रजीतून किंवा मराठी शब्द इंग्रजी अक्षरात लिहून पाठवत असतो. उदाहरणार्थ "ठीक आहे" हे "thik aahe" असे टाईप करून पाठवले जातात. हिच संदेश पाठवण्याची पद्धत जर आपण बंद केली तर!!!
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक मोबाईल मध्ये देवनागरी अक्षरांचे (फॉन्टस) पर्याय उपलब्ध आहेत. सुरुवातीला जरी हे टाईप करण्यास कठीण वाटत असले तरी एकदा सवय झाल्यावर तुम्हाला सुद्धा मराठी भाषेत टाईप करायची गोडी लागेल.
- एक मराठी माणूस
Post #29

खरोखरच खुप जान
ReplyDelete