विकिपीडिया मध्ये दिलेल्या माहितीनुसार-
"वेलेंटाइन दिवस" किंवा "संत वेलेंटाइन दिवस" हा एक असा दिवस आहे जो जगभरात १४ फेब्रुवारी ला साजरा केला जातो. इंग्रजी बोलणाऱ्या बहुतेक देशांमध्ये हा एक पारंपरिक दिवस आहे. या दिवशी प्रेमी युगल एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमाचा इजहार वेलेंटाइन कार्ड
🎊, फूल
🌹 किंवा मिठाई आणि चोकॉलेट्स
🍫 देऊन करतात.



Valentine डे साजरा करावा किंवा करू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. "खर प्रेम करणारे प्रत्येक दिवस #प्रेम
💘 दिवस म्हणून साजरं करतात". खूप कमी लोकांना हे शक्य होतं. पण ९९% लोकांच्या आयुष्यात असं नाही होत. प्रेम करणं आणि प्रेम निभावणं यात खूप अंतर आहे. त्याचं किंवा तीच रागावनं
😣तुम्हाला सहन करता आलं पाहिजे. प्रेमात संयम हवा, समजूतदारपणा हवा. जर समोरच्या व्यक्तीचा कोणत्या गोष्टीला नकार असेल तर तो तुम्ही मोठ्या मनानं मानायला हवा. जर आपल्या चुकीच्या वागण्याने तुमच्या प्रिय व्यक्तीस जर त्रास झाला असेल तर sorry बोलण्यास वर्ष लावू नका
😊. कधी कधी तुमची चूक जरी नसली तरी sorry बोलण्यात काही हरकत नाही
😉.




जसं म्हणतात लग्न ही आयुष्यभराची commitment असते; तसंच खरं प्रेम ही एक अशी commitment आहे जी पुढे त्या प्रेमी युगुलांना पवित्र अशा समजल्या जाणाऱ्या लग्न या नात्या मध्ये रूपांतरित करायची असते. इथं मग प्रश्न येतो arranged marriage करणाऱ्यांचा!! प्रेम विवाह असो किंवा arranged, दोन्ही खेपेस समंजसपणे प्रेम टिकवून ठेवून ते अजून वृद्धिंगत कसे करता येईल याचा विचार करणे हे जास्त महत्वाचे. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक दिवस प्रेम दिवस साजरा करायचा प्रयत्न करा.
- इति लवगुरु
Post #1
No comments:
Post a Comment