Wednesday, 15 February 2017

असा का आहेस तू?

आयुष्याच्या वळणावर मला तुझी गरज भासली, त्या वेळी तू मला नेहमी साथ दिलीस. माझे दु:ख स्वत:चे दु:ख म्हणून समजून घेतलेस. माझा प्रत्येक त्रास तू सहन करून घेतलास. पण तू तुझ्या वेदना मला कधीचं सांगत नाही. तुझे दु:ख तू का लपवतोस.. असा का आहेस तू ?

     आपण एकमेकांवर प्रेम करतो ना.. मग तू माझे दु:खचं का घ्यावे, मला सुद्धा तुझे दु:ख सहन करायला एक संधी दे ना. तू म्हणतोस मी हळवी आहे, मला त्रास सहन होणार नाही, पण नेहमी आनंद मिळेल असे नाही ना. कधी कधी दु:ख पण सोसावे लागते. मग तू ही तसचं समजून तुझ्या वेदना माझ्या सोबत व्यक्त कर ना... मला खूप आवडेल जेव्हा तू तुझे दु:ख माझ्यासमोर व्यक्त करशील. तुला भीती वाटते का, कि मी तुझे दु:ख सहन करू शकणार नाही. असं नाही आहे, मी तुला सुद्धा तशीच साथ देईन जशी तू मला माझ्या दु:खामध्ये देतोस. प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणे ना? मग हे तुला का नाही समजत. तू माझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू तुझे कर्तव्य ही पार पाडतोस. मग मला सुद्धा एकदा संधी दे ना माझं कर्तव्य पार पडण्याची. मी या संधीची वाट पाहतेय.

साभार :- मीष्टी जानू

Post #6

No comments:

Post a Comment